संघटनेचे काम करणाऱ्यांना मिळणार संधी – चंद्रशेखर बावनकुळे

0

जळगाव :- पक्षाचे चांगले काम करणाऱ्या वॉरियर्स यांना पुढील काळात नेते व पदाधिकारी म्हणून संधी दिली जाईल, त्यांनाच भविष्यात महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदींच्या निवडणुकांच्या उमेदवारीसाठी ए.बी. फार्म दिले जातील, तसेच – याच वॉरियर्स मधून भविष्यातील आमदार, खासदार देखील होतील मात्र, ज्या वॉरियर्सच्या बुथवर ५१ टक्के पेक्षा कमी मतदान होईल, त्यांना कोणत्याच निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली जाणार नाही, असे स्पष्ट मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप वॉरियर्सच्या बैठकीत व्यक्त केले.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या – पार्श्वभूमिवर व.वा. वाचनालय – येथे आयोजित जळगाव लोकसभा वॉरियर्सच्या बैठकीत ते बोलत होते. त्यावेळेस महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ खासदार त्यांच्या समर्थनास उभे राहतील, यासाठी जळगावच्या दोन्ही लोकसभेच्या उमेदवारांना सर्वाधिक मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

ऑक्टोंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुका होऊन दि.३० नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेतील असे संकेत फडणवीसांचे नाव न घेता चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच ना. गिरीष महाजन यांच्या शपथ विधीला अमळनेर, जळगाव ग्रामीण व जळगाव शहराचे आमदार उपस्थित राहतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे. यावेळी जळगाव शहराचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांची उमेदवारी जाहीर करत भोळेंना तिसऱ्या टर्मसाठी कामाला लागा असे सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.