आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाने निधी खर्चात राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील आदिवासी एकात्मिक प्रकल्प विकास कार्यालयात काल दि.२९ नोव्हेंबर बुधवार रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित विविध कामांच्या संदर्भातील जिल्हा पातळीवरील वार्षिक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रकल्प अधिकारी अरूण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यासह आदिवासी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या वार्षिक उपयोजना ही १०० % टक्के राबविण्यात आल्या असुन या योजनांची अमलबजावणी शासकीय निधीचा खर्च करण्यासाठी यावलच्या प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती देत प्रकल्प कार्यालयाच्या कामगिरीचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष कौत्तुक केले.

यावल येथील केन्द्र आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन आदीवासी बांधवांसाठी उन्नती प्रगती व त्यांची शैक्षणीक गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि आदिवासी कुटुंबाचे सर्वांगीण विकासाचे हेतु साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या वार्षिक उपयोजना ही १०० % टक्के राबविण्यात आल्या असुन या योजनांची अमलबजावणी शासकीय निधीचा खर्च करण्यासाठी यावलच्या प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती देत प्रकल्प कार्यालयाच्या कामगिरीचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष कौत्तुक केले आहे. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीची डीबीटी अंतर्गत थेट लाभ योजनेच्या लाभापासुन कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता आपण घेणार असुन याबाबत देखील एक आढावा बैठक घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. त्याचबरोबर विद्यार्थी शिष्यवृत्ती, वनधनचे दावे कशा प्रकारे त्वरीत निकाली काढण्यात येतील यासह पेसा अंतर्गत येणारी यावल-चोपडा आणी रावेर या तिन तालुक्यातील ३२ गावांच्या आर्थिक खर्चाबाबत लक्ष केन्द्रित करून आपण लवकरच या संदर्भात बैठक घेणार असल्याची ही माहिती आदीवासी एकात्मिक कार्यालयाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. या वार्षिक अढावा बैठकीत आदीवासी विभागाच्या माध्यमातुन राबविल्या जात असल्याची माहिती आणि विविध योजना अंतर्गत झालेल्या शासकीय निधीची माहीती प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली. बैठकीस उपस्थित राहील्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आदींचे आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.