बिग बॉस सीजन १६ विजेता; घडलं भलतच काही..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

“बिग बॉस सीजन १६” चा सीजन एमसी स्टॅन (MC Stan) ने आपल्या नावे केला आहे. चार महिन्यांनपासून सर्वांनाच याची उत्सुकता होती. शिव ठाकरे हा सेकंड रनरअप झाला असला तरी त्याने आपल्या खऱ्या स्वभामुळे ह्या सीजनमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आहे. अभिनेता आणि बिग बॉस १६’ शोचा होस्ट सलमान खान (Salman khan) याने विजेत्याचं नाव घोषित केलं आणि स्पर्धकांसह चाहते देखील चकित झाले. बिग बॉस १६’ मध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि प्रियंका चौधरी यांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होती. पण ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीवर एमसी स्टॅनचं नाव कोरलं गेलं. सध्या सर्वत्र एमसी स्टॅन याच्या नावाची चर्चा आहे. त्याचदरम्यान शिव ठाकरेला विचारण्यात आले कि तू नाराज आहेस का? त्यावर शिव ठाकरेने उत्तर दिले, शिव म्हणाला, ‘जे व्हायचं होतं ते झालं… ट्रॉफी माझ्या मंडळीतील एमसी स्टॅन घेवून गेला. त्यामुळे मी प्रचंड आनंदी आहे. शिवाय शेवटच्या दिवसापर्यंत विजयी होण्यासाठी मी प्रयत्न केलं. जी गोष्ट मी मनापासून केली, ती मला भेटली आहे. अनेकांनी माझं कौतुक केलं, मला पाठिंबा दिला… लोकांचं प्रेम घेवून मी बाहेर निघालो आहे..’

सांगायचं झालं तर, बिग बॉसनंतर शिव ठाकरे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘खतरो के खिलाडी १३’ शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आता शिवला नव्या शोमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. सोशल मीडियावर देखील शिव ठाकरे याच्या चर्चा रंगलेल्या असतात. खुद्द बिग बॉसने देखील शिव ठाकरेचं शोच्या आठवड्यात कौतुक केलं आहे.

काय म्हणाले बिग बॉस
शिव ठाकरे याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खुद्द बिग बॉस यांनी शिव ठाकरे याचं कौतुक केलं आहे. ज्यामुळे शिव प्रचंड भावुक झाला आणि ‘बिग बॉस तुम्ही सिनेमाच तयार केला आणि मला हिरो केलं.’ आनंदामध्ये शिवने अनेकदा मंचावर डोक टेकवत आभार मानले. बिग बॉस तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे तू दाखवून दिलं आहेस. असं देखील बिग बॉस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.