हतनूर जलाशयावर आढळले दुर्मिळ राजहंस , टिबुकली पाणपक्षी !

0

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ तालुक्यातील हतनूर जलशयावर चातक निर्सग संवर्धन संस्था व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्रतील सर्वात मोठी पाणपक्षी निरिक्षण करण्यात आले.  त्यात १४९ प्रजातीचे पक्षी निरिक्षणासह राजहंस व टिबुकली हि दुर्मीळ पाणपक्षी अढळून आले.

हतनुर जलाशयावर नोव्हेंबर महिण्याच्या सुरुवाती पासूनच विदेशी पक्षी पाहुण्याचे आगमन होऊन पुढील तीन ते चार महिण्याच्या मुकामास असतात तर काही पक्षी एप्रील महिण्यात रशिया या देशातुन कुठेच न थाबता हतनूर जलाशयावर आगमन करीत पंधरा ते वीस दिवस मुक्काम करून उन्हाळ्यात जलाशयातील पाण्याचा साठा कमी होत असल्याने डबक्यातील व गळातील छोटे , छोटे मासे व किटक इत्यादीचा ताव मारत संशक्त झाल्यावर पुढे मार्गस्थ होत असतात . जलाशयाव युराप , रशिया , सायबेरीया , मगोलीया , तिबेट , बलूचीस्थान हिमालयातून अशा ठिकाणांहून अन्नाच्या शोधात येत असतात चातक व वन विभागाच्या पाच गटाने पाणपक्षी निरिक्षणासाठी निवडलेल्या हतनूर ,चागदेव , खामखेडे , मेहुण , चिंचोल , तादलवाडी इत्यादी ठिकाणी पाणपक्षाच्या एकून १४९ प्रजाती अढळून आल्या.

त्यात दुर्मीळ राजसह व टिबुकली हे पाणपक्षी निरिक्षणात पक्षी मित्रास अढळून आले.  पक्षी निरिक्षणात चातक संस्थेचे अनिल महाजन , उदय चौधरी , वन विभागाचे वन सरक्षक विवेक होशिग , समीर नेवे , सत्यपालसिंग , सैरव महाजन , राहुल चव्हाण , पार्थ ब -हाटे , सजय नेवे , व जि. प उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील , नाना पाटील , वन विभागाचे विवेक होशिग , एस , आर चिचोंले , शिल्पा गाडगीळ , कृपाली शिदे यांच्या सह एकून ३५ पक्षी निरीक्षकांनी सहभाग घेतला. वैष्णव , वारकरी , पाणकोंबडी , नैनकरी , चक्रवाक , जाभळी , शेंडी , थापाड्या , बदक , नदीसुरय , शराटी , कृष्ण थिरथीरा , धोबी , भोराडी , खंड्या , वटवटे , तुतारी , फादीधारी , लालसरी , माशीमार , गार्गनी , इत्यादी पाणपक्षाचे निरिक्षणात नोंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.