लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ अपघात ; चौघे कर्मचारी ठार

0

लासलगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

रेल्वे मार्गाची देखभाल करणाऱ्या टॉवर गाडीने रुळावरच काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना चिरडल्याची भीषण दुर्घटना आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली . हे सर्व कर्मचारी लासलगाव परिसरातील आहे. ठार झालेल्या चार कर्मचारी यांचे निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांनी लासलगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले. काही वेळ गोदावरी एक्सप्रेस रोखून धरली होती. कर्मचारयांनी अप रेल्वे ट्रकवर उतरून प्रशासन विरोधात घोषणा दिली. घटना घडून तीन तास झाले तरी वरिष्ठ अधिकारी न आल्याने तीव्र संताप व्यक्त केला .

अपघातामध्ये संतोष भाऊराव केदारे वय 38 वर्षे,दिनेश सहादु दराडे वय 35 वर्षे ,कृष्णा आत्मराम अहिरे वय 40 वर्षे ,संतोष सुखदेव शिरसाठ वय 38 वर्षे,अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पोलीस उप उपनिरीक्षक गवळी, लासलगाव पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक अजिनाठ कोठुले लासलगाव येथील स्टेशन परिसरातील कार्यकर्त्यांनी या चौघांना रुग्णालयात आणले असताना डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी तपासणी करून मृत झाल्याचे घोषित केले. नंतर चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी लासलगाव परिसरामध्ये आक्रोश केला.

टॉवर चालक, मुख्य अधिकारी यांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निफाडच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेनंतर पोलीस उप उपनिरीक्षक गवळी, लासलगाव पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुले उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.