इच्छादेवी ते डी मार्ट रस्ता मार्गातील अडथळा दूर करा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील इच्छा देवी चौक ते मोहाडी फाट्यापर्यंतचा रस्ता कोण करणार, या वादात अनेक वर्ष तो पडून होता. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असल्याने जळगाव महानगरपालिकेकडून हा रस्ता बांधला जात नव्हता. सार्वजनिक बांधकाम खाते मनपाकडे बोट दाखवत होते. अखेर जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता करावा म्हणून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवून दिला आणि या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निविदाही काढण्यात आली. निविदा मंजूर झाली आणि अखेर इच्छा देवी चौक ते मोहाडी फाट्यापर्यंतच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली.

इच्छादेवी चौक ते डी मार्ट पर्यंत डिव्हायडरच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण ठेकेदाराने केले. त्यानंतर डी मार्टच्या संरक्षण भिंतीच्या अतिक्रमणामुळे अतिक्रमित भाग सोडून कमी रुंदीचा रस्ता करण्याचे मान्य केले. आणि अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा तेथे कॉंक्रिटीकरण करण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथ खडसे यांनी अतिक्रमण भिंत काढेपर्यंत ठेकेदारांनी रस्त्याचे काम थांबवावे आणि त्यानंतर चांगला रस्ता करण्यात यावा, अशी मागणी केल्याने भाजपचे जळगाव शहराचे आमदार पुढे सरसावले. मोठ्या मुश्किलीने या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली, आता त्यात राजकारणाचा अडथळा आणू नये, असे आवाहन आ. भोळे यांनी केले. अतिक्रमण काढल्यानंतर तेथील रस्त्याचे काम करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यासाठी आमदार भोळे यांनी महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन हे अतिक्रमण तातडीने काढणे काढावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे आता अतिक्रमण काढण्याचे काम मनपाने तातडीने करावे.

डी मार्ट समोरचा रस्ता अरुंद असो नको असेल तर ते अतिक्रमण काढावे. त्यामुळे आता रस्ते कामाचा बॉल मनपाचे कोर्टात आहे. मनपा आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांनी अतिक्रमण काढण्याचे काम तातडीने करतील हीच अपेक्षा. त्यामुळे आधीच जळगावचे नागरिक खराब रस्त्यामुळे बेजार झालेले आहेत. म्हणून राजकारणी मंडळींनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा करून त्याला अडथड अडथळा आणू नये, असे त्यांना आवाहन करावेसे वाटते. तथापि शहराचे आमदार राजू मामा भोळे हे गेल्या आठ नऊ वर्षापासून जळगाव शहराचे प्रतिनिधित्व करत आहे. यापूर्वी राज्यात २०१४ ते २०१९ पर्यंत भाजपचे सरकार होते. त्यानंतर अडीच वर्ष जळगाव महानगरपालिकेत भाजपची थम्पिंग मेजॉरिटी होती. विशेष म्हणजे आमदार राजू मामा भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या महापौर होत्या. तरीसुद्धा इच्छा देवी मोहाडी रस्ता बांधकाम खाते आणि महानगरपालिका यांच्या नादात रखडला होता. वास्तविक आतापर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही, हे जळगावकरांचे दुर्दैव होय. त्यामुळे आता रस्त्याच्या मंजुरी मिळाली म्हणून दर्जेदार काम झाले पाहिजे याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या दर्जाबाबत पहारेकरी म्हणून घेतलेली भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, हे राजू मामा भोळे यांनी लक्षात घेतले पाहिजे. अन्यथा ठेकेदारांशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळे रस्त्याचे तीन तेरा व्हायला नको. त्यासाठी आमदार एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या भूमिकेचे सर्वत्र समर्थन केले जात आहे.

जळगाव महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा प्रभाव जेवढा प्रभावी असेल तितकी त्यांची कामे होतात. अर्थात ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या उक्तीप्रमाणे त्यांचे त्यांचे वार्डात विकासाची कामे होतात. त्यामुळे अनेक भागात रस्त्याच्या कामांची, गटारींच्या साफसफाईची निकड असताना तेथे होत नाही. महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याने प्रत्येक नगरसेवक आपापल्या वार्डात कामे करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. तथापि आतापर्यंत किमान तीन ते चार महिने कायमस्वरूपी आयुक्त नसल्याने विकास कामे रामभरोसे होती. परंतु डॉ. विद्या गायकवाड यांची कायमस्वरूपी नियुक्ती कोर्टाकडून झाली आणि त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यामुळे कामाचा सपाटा सुरू केला आहे. अजिंठा चौक परिसरातील अतिक्रमणाचा सफाया करून त्यांनी हे दाखवून दिले आहे. महापालिकेत लेट लतीफ हजेरी लावणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कान उघडणे केली आहे. त्यामुळे आयुक्त विद्या गायकवाड यांच्या अभिनंदन केले पाहिजे. त्यामानाने डी मार्ट समोरील अतिक्रमण काही अवघड नाही. त्यांनी महापालिकेचा फौजपाटा पाठवून तातडीने अतिक्रमण दूर करून रस्ता रुंदी करण्यात होणारा अडथळा दूर करावा, हीच अपेक्षा.. आणि ते करतील यात शंका नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.