Big Breaking ! कानपूर पोलीस हत्याकांडमधील मुख्य आरोपी विकास दुबे गोळीबारात ठार

0

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर पोलीस हत्याकांडमधील मुख्य आरोपी गँगस्टर विकास दुबे काल मध्य प्रदेशातील उज्जैन मधून अटक करण्यात आली होती. दरम्यान,आज पहाटे विशेष पथक आरोपी विकास दुबेला उज्जैन येथून कानपूर घेऊन जात होत. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि विकास दुबे यांच्यात गोळीबार झाला. यादरम्यान झालेल्य गोळीबारात पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं असल्याचं वृत्त आज तकने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास दुबे याने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं. गोळीबारात विकास दुबेच्या डोक्याला गोळी लागून ठार झाला. दरम्यान, विकास दुबेचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान याबाबत अद्याप पोलिसांनी अधिकृतपणे माहिती जाहीर केलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.