नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या समन्वयक पदी सोमेश पाटलांची निवड

0

पाचोरा (प्रतिनीधी) : देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची पाचोरा तालुका कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली असुन पाचोरा तालुका समन्वयकपदी  म्हन्जेच Co-Ordinator पदी सोमेश विजय पाटील  यांची निवड करण्यात आली आहे.

राज्य सचिव कमलेश सोनवणे यांच्या शिफारशीनुसार राज्य अध्यक्ष डॉ. त्रेविणी कुमार कोरे यांच्या कार्यालयातून 28 जून रोजी सोमेश पाटिल. यांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले  सोमेश पाटील यांनी या आधी देखिल विविध संघटणेत आपली छाप कायम सोडली आहे. (NGO) असो वा इतर त्यांनी विविध माध्यमातून उत्कृष्ट असे कार्य केले आहे. सोमेश पाटिल यांचे नाव अनेक चांगल्यांपैकी आहे. विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी संपर्क हे चांगल्या कार्याची पावती आहे. जळगांव जिल्हाध्यक्ष तेजस पाटील , जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, महासचिव दिव्या भोसले यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.*

Leave A Reply

Your email address will not be published.