भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची तिघांनी अडवून लूटमार

0

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील वरणगाव रोड वरील संभाजी नगर मधील रहिवासी व रेल्वे लोको पायलट यांना दुचाकीवर आलेल्या तीन इसमांनी अडवून लूटमार करीत १९ हजार ३०० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना येथे घडली.

येथील वरणगाव रोड वरील संभाजी नगर मधील रहिवासी व रेल्वे लोको पायलट रामसिंग टिकाराम मिना (वय ३५) हे दि. ८ जुलै रोजी १५ बंगला भागात गुडस् लॉबी येथे ड्युटीवर जात असतांना त्यांच्या मागून दुचाकीवर आलेल्या तीन इसमांपैकी दोन इसमांनी दुचाकी थांबवून त्यांना अडवून मारहाण करित त्यांच्या जवळील ग्रे रंगाची ड्युटी बॅग हिसकावून जवळ जवळ १९ हजार ३०० रूपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी रामसिंग मिना यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामसिंग मिना हे दि. ८ जुलै रोजी रात्री १.१५ ते १.३० वाजेच्या सुमारास १५ बंगला भागातील गुडस् लॉबी येथे ड्युटीकामी जात असतांना त्यांच्या मागून दुचाकीवर बसलेले तीन इसम आले. दुचाकी त्यांच्यापासून पुढे उभी केली. दुचाकीवरील दोन इसम हे श्री.मिना यांच्याकडे आले. त्यापैकी एकाने मेहंदी कलरचा शर्ट व काळ्या रंगाची पँट घातलेली होती. शरिराने मजबूत व उंची पाच फुट होती. त्या इसमाने श्री.मिना यांना विचारले की, कुठे चालले आहे. त्यानंतर त्याचा दुसरा साथीदार शरिराने सडपातळ, पांढर्‍या रंगाचे टीशर्ट व काळ्या रंगाची जिन्स पँट घातलेला तो माझ्या जवळ आला व माझ्या जवळची ग्रे रंगाची ड्युटी बॅग जबरीने हिसकावित असतांना त्याने श्री.मिना यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यात श्री.मिना यांच्या उजव्या डोळ्या खाली व डाव्या हाताच्या पंजावर व बोटावर जखम झाली आहे. तसेच मुकामार लागला असून त्या अनोळखी लोकांनी बळजबरीने बॅग हिसकावून लांब उभ्या असलेल्या मोटर सायकल वरील मित्रा सोबत दोघीजण बसून निघून गेले. श्री.मिना यांच्या बॅगेत ८०० रूपयांची ग्रे रंगाची बॅग, १७ हजार रूपये किंमतीचा रिअल मी कंपनीचा मोबाईल, त्यात जिओ कंपनीचा एक मोबाईल, त्याच्यानंतर स्टेट बँकेचे दोन एटीएम, एचडीएङ्गसी कंपनीचे एक एटीएम कार्ड, पॅन कार्ड, रेल्वेचे आय कार्ड, रेल्वे परफॉरमन्स कार्ड, ड्युटी साहित्य असा एकूण १९ हजार ३०० रूपयांचा ऐवज अज्ञात आरोपी मारहाण करून जबरीने घेवून गेले.त्यामुळे औषधोपचाराकरिता श्री.मिना रेल्वे हॉस्पीटलमध्ये दाखल झाले होते. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्याने त्यांनी तीन अज्ञात इसमांविरूध्द बाजारपेठ पो.स्टे.ला फीर्याद दिली आहे. त्यामुळे तीन अज्ञात इसमांविरूध्द भा.दं.वि. ३९४, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.