धक्कादायक.. सेवानिवृत्त शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. गुरूच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भुसावळ शहरातील एका ७५ वर्षीय शिक्षकाने १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ट्यूशनला बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

रविवार, ६ मार्च २०२२ रोजी दुपारच्या सुमारास पीडित १२ वर्षीय मुलगी ट्यूशनला गेली होती. तेव्हा ट्यूशनमध्ये कोणीही नव्हते. ही संधी साधून जयंत रायनने (वय ७५, रा. भुसावळ) मुलीवर अत्याचार केला.

दरम्यान घाबरलेली ती मुलगी घरी निघून गेली. घडलेला सगळा प्रकार तिनं आईला सांगितला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात जयंत रायन याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला हे करीत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.