शेअर बाजार कोसळला.. गुंतवणूकदारांचे 6.32 लाख कोटींचे नुकसान

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

रशिया आणि युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine war) परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येत आहे. जगभरातील महत्त्वाचे शेअर बाजार (Share Market) घसरले आहेत. सोमवारी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झालेय. सोमवारी दुपारपर्यंत गुंतवणूकदारांचे जवळपास 6 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

जागतिक पातळीवर झालेल्या पडझडीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झाला आहे. सोमवारी गुंतवणूकदारांना 6,32, 530 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capitalization) सोमवारी 2,46,79,421.28 कोटी रुपये होते. बाजारातीस घसरणीमुळे बाजार भांडवल 2,40,46,891 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. परदेशी गुंतवणूकदारांना 4 मार्च 2022 पर्यंत 7,631 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.

सकाळी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 1300 अंकांनी घसरला होता. ही घसरण 1900 अंकांपर्यंत गेली होती. दुपारच्या सुमारास बाजारातील घसरणीला काही प्रमाणात ब्रेक लागला होता. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1658 अंकांची घसरण झाली होती. तर, निफ्टीमध्ये 442 अंकाची घसरण झाली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.