दोन किलो सोने घेऊन फरार झालेल्या मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या

0

भुसावळ;-दोन किलो सोने घेऊन गेल्या अनेक महिन्यांपासून फरार झालेल्या मनःपूर्वक गोल्ड च्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला एक ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत माहिती अशी की,

शहरातील पांडुरंग टॉकीज भागातील मणपुरम गोल्ड बँकेतील सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून मॅनेजर विशाल दीनानाथ रॉय ( वय २८, रा. देवरिया, उत्तरप्रदेश) याने बँकेतील लॉकरमधून सुमारे दोन किलोहून अधिक सोने चोरून नेत पोबारा केला होता.

प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून विशाल रॉय याच्या मागावर पोलीस होते. तो अनेक महिने हाती लागला नाही. मात्र पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तो भुसावळ रेल्वे स्थानकावर येणार होता. तेव्हा सापळा रचून विशाल रॉय याला अटक करण्यात आली. ही कामगिरी बाजारपेठ पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरिक्षक मंगेश गोटला, सचिन पोळ, सागर वंजारी, सुभाष साबळे, जितेंद्र राजपूत यांच्या पथकाने  कारवाई केली.

विशाल रॉय याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.