भुसावळ शहरातील गुन्हेगाराच्या टोळीतील पाच जणांवर हद्दपारीची कारवाई

0

भुसावळ ;- शहरातील गुन्हेगाराच्या टोळीतील पाच जणांवर जळगाव जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश जिल्हा पेालीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मंगळवार २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दिलेल्या प्रसिद्धीपत्रकान्वये दिले आहे.

 

या टोळीवर भुसावळ लोहमार्ग, भुसावळ बाजारपेठ आणि भुसावळ शहर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाच्या एकूण २४ गुन्हे दाखल आहेत.भुसावळ शहरात शांतता अबाधित राहावी, यासाठी पाचही जणांवर जिल्हा हद्दपारीची कारवाई करावी यासाठी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पाच जणांविरोधात हद्दपारीचा अहवाल तयार करून जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आला. पोलीस अधिक्षक राजकुमार यांनी अहवालाची पडताळणी अंती अखेर टोळीतील पाचही जणांविरोधातील हद्दपारीचा प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार गुन्हेगार बंटी परशुराम पथरोड (वय-३३), विष्णू परशुराम पथरोड (वय-२९), शिव परशूराम पथरोड (वय-२६), रवींद्र उर्फ माया माधव तायडे (वय-२४) आणि हर्षल सुनील पाटील (वय-२४) सर्व राहणार वाल्मिक नगर, भुसावळ यांना दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नगर पाटील यांनी मंगळवारी २८ मार्च रोजी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.