भोंगऱ्या आयु रे भाया … !

0

 

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्या उत्सवाला प्रारंभ

पाल ता रावेर ;– पाल सातपुड्याच्या कुशीत आज पासून भोंगऱ्या उत्सवाची धूम राहणार यानिमित्ताने आदिवासी पावरा समाज बांधव तर्फे तयारी पूर्णत्वाला आली.असून गारखेडा येथे आदिवासी पंच तर्फे विधिवत पूजन करून गुलाल उधळन्यात येऊन टीका लाऊन भोंगऱ्या उत्सवात सहभागी राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले हा उत्सव होळी या सणाच्या निमित्ताने होळी पूर्व आठ दिवसांपूर्वीचे बाजार हाट भरणाऱ्या गावात या उत्सवाचे आयोजन करण्यात येते आठ दिवस पूर्वी गुलाल हाट साजरा करण्यात येतो.

गारखेडा आदिवासी पंच तर्फे सरपंच रतन भंगी बारेला यांनी गुलाल पूजन करून भोंगऱ्या उत्सवात येण्याचे निमंत्रण दिले
यावेळी गिरासिंग बारेला, गाठू बारेला,हिरालाल बारेला, महेश बारेला, कुर्बान तडवी,इरफान तडवी सुभाष बारेला, इनेश बारेला आदी उपस्थित होते
असा भरणार भोंगऱ्या बाजार सोमवार पाडल्या,मंगळवार पाल,बुधवार सिरवेल, गाड्ग्याआम,शनिवार गारखेडा,व बोरी रविवार गाडऱ्या जामन्या या रोजी भरणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.