अरे देवा..भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये हाणामारी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर. या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. निसर्गरम्य वातावरणात असलेले हे मंदिर निसर्गप्रेमींसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरात गुरवांच्या दोन गटांत पूजेच्या अधिकारातून जोरदार हाणामारी झाली. पोलिसांसमोर हा प्रकार सुरु होता. अखेर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीत काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. यापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये पुजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली आहे.

काय घडला प्रकार
भीमाशंकर मंदिरात पुजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये वाद आहेत. सोमवारी भाविक रांगेत उभे होते, त्यावेळी दुसऱ्या गटाचा जमाव मंदिराच्या गाभाऱ्यात घुसला. यावेळी पाटावर पुजेसाठी बसलेले पुजारी विजय भिमाजी कौदरे यांना दमदाटी करून पाटावरून उठवले. त्यानंतर दमदाटी आणि शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. हाताने व लाथा बुक्यानी मारहाण केली, अशी तक्रार गोरक्ष यशवंत कौदरे यांना दमदाटी करून पाटावरून उठवले. त्यावरुन एका गटाच्या पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शंकर कौदरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मंदिरात पुजेच्या कारणावरुन आपणास प्लास्टिक खुर्ची आणि लोखंडी पाईप मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार शंकर कौदरे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.