बहुप्रतीक्षित ‘खुर्ची’चा मोशन पोस्टर प्रदर्शित

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्याच्या राजकारणावर भाष्य करणारे अनेक चित्रपट आणि बऱ्याच वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. निवडणुकीचा धुरळा, सत्तासंघर्ष अशा अनेक मुद्यांवर त्या चित्रपटांच्या माध्यमातून मिश्किल टिप्पणी करण्यात आली आहे. अशातच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या अशातच आणखी एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘खुर्ची’ असं आगामी चित्रपटाचं नाव असून नुकतंच चित्रपटाचं नाव आणि पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. ‘सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच’ असं म्हणत चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

चित्रपटाच्या रिलीज डेटासोबतच चित्रपटाचं नवं मोशन पोस्टर देखील सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. या मोशन पोस्टरमध्ये निवडणुकीचा धुराळा उडतांना दिसत आहे. तर, लोक हातात झेंडे घेऊन दिसत आहे. बॅकग्राऊंडला दमदार संवाद, बॅकग्राऊंड म्युझिक ऐकायला येत आहे. तर, या जल्लोषाच्या केंद्रस्थानी एक खुर्ची दिसतेय.

ढोल ताशे आणि माणसांच्या इतक्या गर्दीतही ही सत्तेची ‘खुर्ची’ मात्र प्रचंड चर्चेत आहे. या खुर्चीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अगदी राजेशाही थाट असलेल्या या ‘खुर्ची’साठी रंगलेली चुरस आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी अर्थात १२ जानेवारी २०२४ रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.