भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळकांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक सचिन मदन पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग घेऊन टिळकांविषयी आपली मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भूषण पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका मोनिका पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.