“जामोद” येथे समाजसेविंतर्फे शालोपयोगी साहित्याचे वाटप…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने “समाजसेवा हिच नारायण सेवा” या ईश तत्वाची शिकवणूक देणाऱ्या प.पू.श्री. सत्य साई बाबांच्या प्रेरणेने जळगांव जिल्हा न्यायालयातील सेवा निवृत्त अधीक्षक आर. व्ही.पाटील, ॲड.शरीफ पटेल, जळगांव मुख्य न्यायदंडधिकारी न्यायालयातील कर्मचारी बी.जी.नाईक आणि व्ही.आर.वंजारी तसेच रामानंद पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण भोसले यांच्या आर्थिक योगदानातून जामोद या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ते ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, कंपास कीट, वॉटर बॅग, लंच बॉक्स इत्यादी शैक्षणिक साहित्याचे आणि अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटाचे आज शनिवार दि. २३/७/२०२२ रोजी समाज सेवेच्या स्वरूपात वाटप करण्यात आले.

तसेच यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाळेचे केंद्र प्रमुख युवराज परदेशी, मुख्यध्यापक सुभाष पाटील, उपशिक्षक भगवान पाटील, सरपंच उषाबाई पाटील, पोलीस पाटील शरद पाटील, शाळेतील विद्यार्थ्यांना दर शनिवारी मोफत दूध वाटप करणारे गणेश पाटील आणि अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास गट शिक्षण अधिकारी फिरोज पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास पालकांची आणि गावकऱ्यांची देखील उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.