घरातील दिड लाखांच्या मुद्देमालावर अज्ञात चोरट्यांचा डल्ला

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील गोंडगाव येथे घरात ठेवलेला स्टीलचा डबा चोरून त्यातील रोक रक्कम, सोने, बँक पासबुक, आधार कार्ड, रेशन कार्ड, आदी दिड लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानीं चोरल्याची घटना दि.31 जानेवारी रोजी घडली. या बाबत भडगाव पोलिस स्टशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती, अशी कि फिर्यादी सुनील नगराज पाटील (वय- 38) धंदा-मजुरी (आचारी) रा.गोंडगाव कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिरायदीची समती नसताना लबाडीचा इराद्याने घराच्या दरवाज्यात प्रवेश करून घरातील स्टीलचा डबा चोरून त्यातील एक लाख सदतीस हजार रुपये, बारा हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम सोने, बँक पासबुक, आधार कार्ड, रेशन कार्ड, इत्यादी एकूण एक लाख, एकोन पन्नास हजार किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरले आहे. अज्ञात चोरट्या विरूद्ध गु.र. न.29/2023 भा. द.वी.कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो. ना. नरेंद्र विसपुते हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.