गिरणा नदी पात्रात दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या 60 वर्षीय वृद्धाचा कोरलेल्या खड्ड्यांमुळे मृत्यू

0

भडगाव- प्रतिनिधी

भडगाव शहरातील गिरणा नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. या मुळे जे.सि.बी. द्वारा मोठं मोठे खड्डे कोरले असल्यामुळे पात्रात दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या 60 वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली.
या बाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन दिवसापासून गिरणा नदी पात्रात बेपत्ता असलेल्या अर्जुन जंगलू ठाकरे वय 60 रा. खापरखेडा ता. शहादा. ह. मु. गिरणा कॉलनी भडगाव हा नदीपात्रात गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता होता. पात्रात जेसिबी द्वारा मोठं मोठे खड्डे कोरले असल्यामुळे बेपत्ता होता. नातेवाईक मंडळीनी त्यास दोन दिवसापासून शोधा शोध केली. परंतु मिळून आला नाही. दि.28 रोजी 11 वाजेच्या सुमारास पिंपळगाव जवळ नदीपात्रात सापडला या नंतर त्याला भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. म्हणून भडगाव पोलिस स्टेशनला वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरिवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. सचिन वाबळे हे करत आहे. वाळू माफियांा नी गिरणा पात्रात मोठ मोठे खड्डे पाडले असल्याने या 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे बोलले जात. असून याला याला जबाबदार कोण ? असा सवाल शहरातील सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.