“वेध रायगडाचा” या पुस्तकाचे लेखक रवींद्र पाटील अवलिया व्यक्तिमत्त्व

0

भातखंडे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

प्रापंचिक जीवन जगत असताना प्रत्येकाची एक जीवनशैली असते असेच एक अवलिया जीवनशैली जगत असणारे व्यक्तिमत्व रवींद्र तुकाराम पाटील हे मूळचे हिंगोणा तालुका चाळीसगाव येथील रहिवासी परंतु व्यवसायाच्या निमित्ताने पाचोरा या शहरात ते रहिवासी झाले. तुळजाई क्रॉप सायन्स पाचोरा येथे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. तसं त्यांना बालपणापासूनच सामाजिक कार्याची गोडी होती यात त्यांनी विवेक विचार मंच, शिवशंभो विचार दर्शन, इतिहास संकलन समिती, इतिहास प्रबोधन संस्था, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी, जिल्हा संघटन मंत्री या विविध संघटनांमध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

याबरोबर त्यांचा व्यासंग म्हणजे व्याख्यानाचा व्याख्यानातून त्यांनी थोरलं राजं सांगून गेलं, छत्रपती शिवराय, शापित राजहंस, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, शाहिद शिरोमणी भगतसिंग, दशमेश गुरु गोविंद सिंग, मार्ग महामानवाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, देशाची दिशा आणि दशा, घटनेची निर्मिती प्रक्रिया, मी आणि माझी कविता, मी आणि समाजमन, आपले अस्तित्व आणि राष्ट्र, हिंदू सूर्य महाराणा प्रताप, छळाकडून बळाकडे,तसेच त्यांनी आजपर्यंत केलेली ऐतिहासिक व्याख्याने शिवरायांचा गनिमी कावा, शिवकालीन राज्यव्यवस्था, शिवकालीन सैनिकी प्रशिक्षण, शिवकालीन अर्थव्यवस्था या विषयांवर त्यांनी आजपर्यंत व्याख्याने केलेले असून  त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

यात किल्ले रायगड एक ऐतिहासिक मीमांसा, राजा माझा सांगून गेला, शंभू हत्या शोध तथ्य आणि मिथ्य, छत्रपतींचे भावविश्व, शिवरायांची युद्धनीती, माँ जिजाऊ ही पुस्तके त्यांची प्रकाशानाच्या मार्गावर असून आत्तापर्यंत त्यांनी २६० किल्ल्यांचे प्रत्यक्ष भ्रमण केले आहे. आत्तापर्यंत त्यांनी २२५ वेळा रायगड किल्ल्याचे भ्रमण केलेला आहे. नुसतेच भ्रमण केले नसून त्याचा सखोल असा अभ्यास केलेला आहे तर १४९६; एव्हढी व्याख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटकात पूर्ण केले असून २००५ या वर्षाचा राजस्थान सरकारचा “कवीभूषण पुरस्कार” त्यांना प्राप्त झालेला आहे. अशा या अवलियाचे “वेध रायगडाचा” या पुस्तकाचे प्रकाशन चोखंदळ वाचकांसाठी लवकरच प्रकाशित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.