महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे भडगावात भव्य रोजगार मेळावा

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा शक्ती फाऊंडेशन नासिक यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 5 रविवार रोजी तरुण तरुणाईसाठी भव्य रोजगार मेळावा सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मैदान पाचोरा रोड ग्रामीण रुगणालय जवळ येथे आयोजित केला आहे.

बेरोजगार तरुण तरुणींसाठी जळगाव, औरंगाबाद, नाशिक, सिन्नर, पुणे, मुंबई या ठिकाणी रोजगाराची संधी या मेळाव्यात मिळू शकते. तरी खानदेशातील तरुण तरुणींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.