भुसावळ-औरंगाबाद रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी १५ लाखांचा निधी

0

लोकशाही न्युज नेटवर्क
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला असून त्यात भुसावळ विभागाला तब्बल 1470.94 कोटींचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंतच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत मिळालेला हा निधी तिप्पट असल्याने वेगाने विकासात्मक कामे होण्याची आशा आहेत. विद्यमान कामांच्या पूर्ततेसाठी तसेच नवीन रेल्वे मार्गांचे सर्व्हेक्षणासाठी निधी मंजूर करण्यात आला असून भुसावळ-औरंगाबाद या 160 किलोमीटर अंतराच्या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे.  15 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ईगतपुरी-भुसावळ नवीन 3 री लाईन 308 किलोमीटर सर्वेक्षणासाठी 15 लाख रुपये, भुसावळ-खंडवा नवीन तिसर्‍या व चौथ्या 123 किलोमीटर अंतराच्या रेल्वे लाईनसाठी 15 लाख रुपये, औरंगाबाद-भुसावळ नवीन लाईन 160 किमी सर्वेक्षणासाठी 15 लाख. औरंगाबाद-बुलढाणा-खामगाव नवीन लाईन 170 किमी सर्वेक्षणासाठी 25 लाख, भुसावळ-बडनेरा-वर्धा नवीन चौथी लाईन अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी 313 किमीसाठी पाच कोटी 26 लाख रुपये, भुसावळ-खंडवा नवीन तिसरी/ चवथी ओळ अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी 1 कोटी (बांधकामासाठी), मनमाड-जळगाव नवीन चौथ्या लाईनच्या फायनल लोकेशन सर्व्हेसाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.