मंगळसूत्र लांबविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन महिलांना पकडले

0

लोकशाही न्युज नेटवर्क
घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पसार होणाऱ्या प्रयत्नात असलेल्या चाळीसगाव येथील दोन संशयित महिलांना नागरीकांच्या सतर्कतने रंगेहात पकडले आहे. याबाबत पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पेठ येथे गंगाबाई पंढरी पाटील काही महिलांसोबत घराकडे जात असताना गर्दीमध्ये अनोळखी महिलेने त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची पोत तोडली. त्यातील काही सोन्याचे मणी त्यांच्या ब्लाऊजर पडल्याने त्यांच्या लक्षात आले त्यांनी मागे वळून बघितले असता अनोळखी महिला पाठीमागे पोत चोरत असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही महिला घाई घाईत पळत असताना लक्षात आले आरओरड केली. त्या ठिकाणी उपस्थित भास्कर पांढरे, अमोल दौगे, अक्षय पाटील या तिघांनी या दोन्ही महिलांना रंगेहाथ पकडले. त्या महिलांपासून सोन्याची पोत हिसकावून घेतली ताबडतोब पोलिसांना याबाबत या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. गंगाबाई पंढरी पाटील यांच्या फिर्यादीवरून राणी विजय कांबळे (वय-३६) आणि मालनबाई सुरेश कसबे (वय-५०) रा. चाळीसगाव जिल्हा जळगाव या दोन्ही महिलांनी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार रवींद्र देशमुख हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.