वीज चोरी करणे भोवले; भडगावातील एकाला १ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

वीज चोरी (Electricity Theft) करुन महावितरणाची फसवणूक केली म्हणुन भडगाव येथील एका विरुद्ध २९ डिसेंबर २०१९ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा निकाल दि. १६ रोजी जिल्हा न्यायालयाने दिला असुन वीज चोरांना चांगलाच दणका दिला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वीज चोरी करणाऱ्या भडगाव तालुक्यातील एका आरोपीला १ वर्षे सक्त मजुरी आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. जे. मोहिते यांनी मंगळवारी १६ मे रोजी सुनावली आहे. भडगाव शहरांतील राहणारे पंजाबराव धनराज देशमुख यांनी पोल्ट्रीफार्म हाऊस (Poultry Farm House) येथे मका दळण्याच्या गिरणीवर महावितरण कंपनीची मीटर लावण्यात आली आहे. या गिरणीवरील वायर कट करून त्यामधून सुमारे ४४ हजार ३७५ युनिट म्हणजेच २ लाख ९३ हजार ७२० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता अभय मनोहर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात २९ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने हा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. या गुन्हाचा तपास पोलिस नाईक प्रल्हाद भाऊराव शिंदे यांनी केला. तसेच केस वॉच, साक्षीदार तपास पो. कॉ. भाऊसाहेब पाटील यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.