भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी १०९ उमेदवारी अर्ज दाखल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पाचोरा भडगाव बाजार समितीची निवडणुक (election) रंग भरत असतांना आता त्यापाठोपाठ भडगाव शेतकरी सहकारी संघाचा निवडणुकीचा कार्यक्रम लागला आहे. संस्थेच्या १५ जागासांठी १०९ एवढे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. दि. २५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भडगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात ईच्छुक उमेदवारांसह राजकीय मंडळींची मोठी उपस्थिती दिसुन आली. दि. २१ मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. संस्थेच्या एकुण १५ जागांसाठी ही पंचवार्षीक निवडणुक होणार आहे. दि. १९ पासुन नामनिर्देशन पञांची विक्री सुरु झाली होती. दि. २५ पर्यंत एकुण १४८ नामनिर्देशन पञांची विक्री झाली होती. तर एकुण १०९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. माहिती भडगाव सहाय्यक निबंधक कार्यालय प्रशासनाकडुन देण्यात आली.

निवडणुकीचा बोलबाला सुरु असुन राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार आतापासुन गुडघ्याला बाशिंग बांधुन तयारीला लागल्याचे दिसत आहे. यावेळेस भडगाव शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षीक निवडणुक गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. ही निवडणुक गाजते कि बिनविरोध होते याकडे संपुर्ण तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागुन आहे.भडगाव बाजार समितिच्या निवडणुकीतील काही नाराज मंडळी वा ईच्छुक मंडळी भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत उतरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतांना दिसत आहे. भडगाव येथील शेतकरी सहकारी संस्थेची पंचवार्षीक निवडणुकीची मुदत संपलेली आहे. मतदानाची अंतिम यादी दि. ३/४/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संस्थेच्या एकुण १५ जागांसाठी ही आगामी निवडणुक होणार आहे. या संस्थेची वार्षिक कोटयावधी रुपयांची आहे. भडगाव शेतकरी सहकारी संघ ही शेतकर्यांसाठी संस्था असुन मोठी संस्था म्हणुन संस्था नावाजलेली आहे. आता माघारीकडे राजकीय मंडळींसह नागरीकांचे लक्ष लागुन आहे. तर या निवडणुकीकडे संपुर्ण भडगाव तालुक्याचे लक्ष लागुन आहे.

भडगाव शेतकरी संघाची निवडणुक १५ जागांसाठी
भडगाव शेतकरी सहकारी संघ ही तालुक्यात नावाजलेली संस्था आहे. नागरीकांना शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीची आतुरता लागुन होती. ही निवडणुक एकुण १५ सदस्य पदाच्या जागांसाठी होणार आहे. यात मतदार संघावाईज प्रमाणे जागा आरक्षणानुसार आहेत. यात ६ जागा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदार संघ, ४ जागा व्यक्तीशा मतदार संघ, १ जागा अनुसुचीत जाती जमाती मतदार संघ, १ जागा इतर मागास वर्गीय मतदार संघ, १ जागा वि. जा. म. ज. मतदार संघ, २ जागा महिला राखीव संघ अशा जागा आहेत. संस्थेची मतदार संख्या ४३१२ इतकी आहे. भडगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटींचे एकुण ४१ ठराव यापुर्वीच करण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार आतापासुनच सभासदांच्या संपर्कात असल्याचे नजरेस पडत आहे. ही निवडणुक गाजते का बिनविरोध होते. आता पासुनच याकडे नागरीकांचे लक्ष लागुन आहे. खरे चिञ माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे. बाजार समिती निवडणुकी प्रमाणे भडगाव शेतकरी सहकारी संघाची निवडणुक गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.

भडगाव शेतकरी सहकारी संघ निवडणुकीसाठी ९ नामनिर्देशन पञांची विक्री
भडगाव शेतकरी सहकारी संघ पंचवार्षीक निवडणुकीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम लागलेला आहे. यात दि. १९/४/२०२३ ते दि. २५/४/२०२३ या दरम्यान सकाळी ११ ते ३ या वेळात नामनिर्देशन पञांची विक्री व दाखल करणे. छाननी ता. २६/४/२०२३ सकाळी ११ वाजता. माघार ता. २७/४/२०२३ ते ता. ११/४/२०२३ सकाळी ११ ते ३, पाञ उमेदवारांचे निशाणी वाटप अंतिम नामनिर्देशन पञाची यादी प्रसिद्ध करणे ता. १२/५/२०२३ सकाळी ११ वाजता. मतदान ता. २१/५/२०२३. मतमोजणी ता. २२/५/२०२३ सकाळी ८.३०. वाजेपासुन सुरु होईल अशी माहिती भडगाव सहाय्यक निंबधक कार्यालयाचे निवडणुक निर्णय अधिकारी महेश कासार, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अविनाश पाटील यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.