KKBKKJ; पाचव्या दिवसाच्या कमाईत घट, 200 कोटींचा टप्पा गाठू शकेल का?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

बहुप्रतीक्षित चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisika Bhai Kisiki Jan) ईदच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला, पण पाहिजे तशी कमाई चित्रपट करू शकला नाही. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने समाधानकारक कमाई केली. मात्र अद्याप ‘भाईजान’च्या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा गाठला नाही. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. पहिल्या दिवशी 15 कोटींच्या कमाईनंतर ‘किसी का भाई किसी की जान’ने शनिवारी आणि रविवारी दमदार गल्ला जमवला. मात्र पाचव्या दिवसाच्या कमाईत घट झाली. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे (Pooja Hegde), शहनाज गिल (Shahnaz Gill), पलक तिवारी (Palak Tiwari), राघव जुयाल (Raghav Juyal), जस्सी गिल (Jassi Gill), सिद्धार्थ निगम (Siddharth Nigam), व्यंकटेश डग्गुबती (Venkatesh Daggubati), जगपती बाबू (Jagpati Babu) अशी कलाकारांची मोठी फौज आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, ज्या चित्रपटांची कथा जबरदस्त असते आणि संपूर्ण चित्रपट एक एंटरटेन्मेंट पॅकेज असतो तो चित्रपट दोन आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर ठिकठाक कमाई करतो. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट सलमानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक नाही. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा गाठू शकेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुदैवाने 2 जून रोजी शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाआधी कोणताच मोठा चित्रपट प्रदर्शित होत नाहीये. त्यामुळे सलमानच्या चित्रपटाकडे कमाईसाठी पुरेसा वेळसुद्धा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.