भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत रिदान पटेल राज्यातून दुसरा तर यश चौधरी पाचवा

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सेंट्रल प्रकाशन संस्था, कोल्हापूर आयोजित सर 2022-23 मधील राज्यस्तरीय भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेचा( I .T. S. E) निकाल नुकताच जाहीर झाला. सदर परीक्षेत रिदान राजू पटेल हा पि.के. शिंदे विद्यालय पाचोरा या शाळेचा विद्यार्थी वर्ग चौथीतून ३०० पैकी 286(९५%) गुण मिळवत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत दुसरा आला. तो पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक व प्रभारी केंद्रप्रमुख श्री राजू पटेल सरांचा मुलगा आहे. तसेच द वर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा शाळेचा विद्यार्थी यश भटुकांत चौधरी हा वर्ग पहिलीतून 200 पैकी 192 गुण( ९६%)मिळवत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवा आला. तो मोंढाळे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक भटुकांत रमाकांत चौधरी सरांचा मुलगा आहे. दोघांच्या या यशासाठी त्यांना वर्गशिक्षक, मुख्याध्यापक व पुरुषोत्तम पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. रिदान पटेल व यश चौधरी यांचे त्यांच्या या यशासाठी सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.