राजेंद्र कोंढरे यांनी घेतलेली सर्वसाधारण सभा अनधिकृत

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय मराठा महासंघ रजि. क्र.६६९-ए (मुंबई) या सर्व सभासदांना जाहीर नोटीस द्वारे कळवण्यात येते की अखिल भारतीय मराठा महासंघ ही मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1990 द्वारे नोंदणीकृत संस्था असून संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय क्षत्रिय मराठा भवन, ५ नवलकर लेन, प्रार्थना समाज, गिरगाव, मुंबई-४००००४. हे असून सदर इमारत पुनर्विकास करण्यासाठी धर्मादाय आयुक्त मुंबई यांनी परवानगी दिली. त्यासाठी पाडण्यात आलेली आहे.

सध्या तात्पुरती व्यवस्था असून शिवनेरी सभागृह, शिवाजी मंदिर येथे कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे. संस्थेची सण 2019 ते 2022 ची कार्यकारणी अस्तित्वात होती व आहे. सदर कार्यकारणी अस्तित्वात असताना सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी कार्यकारणीतील इतर सदस्यांना विश्वासात न घेता व कोणतेही समिती न घेता संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई येथे असताना बेकायदेशीरपणे पुणे येथे दि. ०३/११/२०२१ रोजी घटनाबाह्य सर्वसाधारण सभा बोलावली व त्यांना कोणतेही अधिकार नसताना मा. अध्यक्षांचे अधिकार गोठवण्याचे घोषित केले. व स्वतःला अध्यक्ष म्हणून घोषित केले.

अध्यक्ष ॲड्.शशिकांत पवार यांनी त्यास असलेले विशेष अधिकाराचा वापर करून दि.०४/११/२०२१ रोजी मुंबई येथे झालेले सरचिटणीस राजेंद्र कोंढरे संस्थेचे पदाधिकारी नाहीत व त्यांना अखिल भारतीय मराठा महासंघ या संस्थेच्या नावाने कोणतीही निधी जमा करण्याचा सभा अथवा सर्वसाधारण सभा बोलण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. असे असताना राजेंद्र कोंढरे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष असल्याचे भासवून दि.२९/०१/२०२३ रोजी पंढरपूर येथे सर्वसाधारण सभा आयोजित केल्याने आमचे निदर्शनास आलेले आहे. सबब आपणा सर्वांना कळविण्यात येते की राजेंद्र कोंढरे यांनी दि.२९/०१/२३ रोजी बोलावलेले सर्वसाधारण सभा अनधिकृत असून सदर सभेत ठरलेले कोणताही निर्णय अखिल भारतीय मराठा महासंघावर बंधनकारक असणार नाही व तो बेकायदेशीर असेल कृपया आपण याची नोंद घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.