भडगावात रिपाई जळगाव जिल्हाध्यक्ष तथा भुसावळ नगरसेवक राजुभाई सुर्यवंशी यांचे स्वागत

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा भुसावळ येथील नगरसेवक राजुभाई सुर्यवंशी यांचा धावता दौऱ्यात तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर अण्णा व वंचित बहुजन आघाडीचे भडगाव तालुका अध्यक्ष आण्णासाहेब मोरे यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी आगामी काळातील निवडणुका यांच्यासह तालुक्यातील विविध प्रकारचे प्रश्नांची माहिती घेत चर्चा विनिमय करून मार्गदर्शन केले. याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आण्णासाहेब मोरे, भडगाव तालुका पत्रकार संघाचे भडगाव तालुका अध्यक्ष व दैनिक लोकशाहीचे प्रतिनिधी सागर महाजन, उत्तर महाराष्ट्र पत्रकार विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, भडगाव रिपाई तालुका कार्याध्यक्ष गुरुदास भालेराव, सेवानिवृत्त सैनिक आघाडीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तायडे उपस्थित होते. याप्रसंगी राजुभाई सुर्यवंशी यांनी धावती भेट दिल्याने रिपाईचे भडगाव तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर आण्णा यांनी त्यांचे जाहीर आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.