भडगावात घराच्या समोर लावलेली कार चोरीला; गुन्हा दाखल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव शहरातील बाळद रोडवरील विवेकानंद नगर येथून घराच्या बाजूला लावलेली मारुती सियाज चोरीला गेल्याची घटना दि. 13 रोजी मध्यरात्री घडली. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बाळद रस्त्यावरील घराच्या समोर लावलेली साडेसहा लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची मारुती सियाज गाडी क्रमांक एम एच 19 सी. यू. 5309 ही चारचाकी गाडी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या संमती वाचून लाबडीच्या इराद्याने चोरून नेली. याप्रकरणी महेंद्र रवींद्र अहिरराव रा. भडगाव यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 315 /2022  भा.द.वी.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पो.हे. कॉ. सचिन बावळे हे करत आहे. तसेच एका महिन्यापूर्वी शहरातील पाचोरा रस्त्यावरील एच. कॉलनी येथून घराच्या बाजूला लावलेली मारुती स्विफ्ट कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तसेच आज देखील पुन्हा कार चोरी झाली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, भडगाव पोलिसांनी संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश लवकर करावा व नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.