
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
चित्रपटगृहातला चालू शो बंद केल्याच्या प्रकरणात आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड जामीनावर बाहेर आले. मात्र, त्यानंतर काही तासांतच त्यांच्याविरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेनं केलीये.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'परस्त्री आम्हा माते समान' या विचाराचा वारसा जोपसणाऱ्या महाराष्ट्रात एक लोकप्रतिनिधी भावाच्या नात्याने एका महिलेला गर्दीच्या विळख्यातून बाजूला उभे राहण्याची विनवणी करणे हे आजच्या सत्ताधाऱ्यांना रूचत नाही का? @CMOMaharashtra @maharashtra_hmo pic.twitter.com/0pnhMyrUIr
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 14, 2022
यावरून सध्या राजकीय वर्तुळात वादविवाद सुरू असताना, आता त्या घटनेचा व्हिडीओच समोर आला आहे. राष्ट्रवादीनं पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. धक्काबुक्कीत कशाला येताय जरा साइडला जा, असं या व्हिडिओत जितेंद्र आव्हाड महिलेला सांगत आहेत. हा विनयभंग होऊ शकतो का ? असा सवाल यावेळी राष्ट्रवादी कडून करण्यात आला आहे.

