Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»भडगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
    उत्तर महाराष्ट्र

    भडगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- जिल्ह्यातील भडगाव येथील वाळू तस्कारी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दिले आहे. त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेत रविवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी भडगाव पोलीस कर्मचारी नागपूर येथे रवाना झाले. संजय सुरेश त्रिभुवन वय -२६ रा.वाक ता.भडगाव असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

    झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले तसेच औषधीजन्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आणि विनापरवाना वाळू तस्कर करणारे, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानबध्द आणि हद्दपारी करण्याच्या कारवाया करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेले आहेत. या अनुषंगाने भडगाव तालुक्यातील वाक येथे राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याच्या विरोधात हद्दपारची कारवाई करावी, यासाठी भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी प्रस्ताव तयार केला,

    हा प्रस्ताव जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पाठवला. या प्रस्तावाचे अवलोकन करून स्थानबद्ध करण्याच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी रवाना केला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रस्तावाला मंजुरी देत रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोकॉ. प्रवीण परदेशी, संदीप सोनवणे, जितू राजपूत अशांनी रेकॉर्ड वरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याला ताब्यात घेत नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात देण्यात आले.

    #bhadgaon #crime jalgaon nagpur jail
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif