प.पु.१०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ भडगाव तहसिलदारांना जैन समाजाचे निवेदन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जैन समाजाचे साधू प. पु.१०८ कामकुमारनंदी महाराज यांची कर्नाटकातील हिरकुडी ता. चिकोडी जि. बेळगांव येथे झालेल्या अमानुष हत्येच्या निषधार्थ आज भडगाव येथील जैन नवयुवक मंडळातर्फे नायब तहसिलदार रमेश देवकर यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले की, हिरकुडी ता. चिकोडी जि.बेळगाव, कर्नाटक राज्य येथील प. पु. 108 कामकुमारनंदी महाराज यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. चातुर्मासच्या पवित्र दिवसाच्या सुरवातीला अशा प्रकारची क्रूर घटना म्हणजे अहिंसेच्या मुलतत्वाची निर्घुण हत्या म्हणावी लागेल.
या घटनेमुळे संपूर्ण जैन समाजामध्ये तीव्र आक्रोश असून अत्यंत निंदनीय घटनेचा सकळ जैन समाज भडगाव ता. भडगाव यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

कर्नाटक सरकारने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देवून हत्या करणाऱ्या दोषी आरोपींवर अत्यंत कठोर शिक्षा करावी. तसेच साधू ,साध्वीच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. जैन समाजाने यापूर्वी वेळोवेळी साधूंच्या सुरक्षीतेबाबत सरकारला निवेदन दिले आहेत. पुन्हा एकदा केंद्र व राज्य सरकारने कायम स्वरूपी सुरक्षेसाठी योजना करावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी जैन श्रावक चे संघपती मदनलाल जैन, सुभाष रांका, सुरेश भंडारी, नवयुवक मंडळांचे अध्यक्ष प्रितम भंडारी, उपाध्यक्ष दर्शन लुंकड, लोकेश चोरडिया, सचिव शुभम सुराणा, सचिन जैन, राहुल ओस्तवाल प्रतिक रांका, पियुष भंडारी, तिलक भंडारी, शुभम भंडारी, संदीप भंडारी, राहुल जैन, राजु चोरडिया, सुनील साभद्रा, मनीष चोरडिया, विजय चोरडिया, विजय चोरडिया, मंगेश लूनावत, भवरलाल लुनावत, लोकेश पारख आदि निवेदन देताना उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.