छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी निसर्ग मिञ धनराज पाटिल यांची निवड

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती आयोजित कर्तुत्व व नेतृत्वाचा सन्मान – २०२३ छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी पिचर्डे येथील पर्यावरण प्रेमी, निसर्ग मिञ व पत्रकार धनराज भिकन पाटील यांची निवड झाली असून, याबाबत निसर्ग मित्र समितीचे प्रेमकुमार अहिरे, डी.बी.पाटील यांचे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रात म्हटले आहे की, सामाजिक,शैक्षणिक, कृषी व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती तर्फे ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने व निसर्ग मित्र समितीचा वर्धापन दिनी आपली छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे. दिनांक – १८ / ०६ / २०२३ रविवार रोजी देवपूर धुळे या ठिकाणीं कार्यक्रम संपन्न होणार आहे. या बद्दल धनराज पाटिल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.