कै.शेठ बक्तावरमल चोरडीया अभ्यासिकेच्या १२ विद्यार्थ्यांचा सत्कार

0

भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव नगरपरीषद संचलीत कै.शेठ बक्तावरमल चोरडीया अभ्यासिकेचे १२ विद्यार्थ्यांचे भारतीय सैन्य दलात तसेच पोलिस पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या हस्ते  विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय सैन्य दलात निवड होऊन देशाची सेवा करण्याचा योग मिळाला म्हणून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

. भडगाव शहरातील व अभ्यासिकेचे विद्यार्थी ज्ञानेश्वर गोविंदा पाटील (आर्मी), गोपाल सुनिल महाजन (आर्मी), गोपाल आनंदा जाधव(आर्मी), सचिन दगडू पाटील (आर्मी),शुभम सुरेश पाटील (पोलिस),गजेंद्र जगन्नाथ सुर्यवंशी(पोलिस),ईश्वर शालिक चौधरी ( पोलीस),गणेश भिला निकम (पोलीस),आकाश श्रीराम माळी (बी. एस. एफ),अमोल छोटू क्षीरसागर (बी. एस. एफ),कमलेश भीला पाटील (बी. एस. एफ) हे विद्यार्थीनी भरतीमध्ये यश प्राप्त केले आहे. या कार्यक्रमासाठी नगर परिषदेतील कार्यालयीन अधीक्षक अजय लोखंडे, पुरवठा अभियंता गणेश लाड, स्थापत्य अभियंता रणजीत पाटील, कर निरीक्षक श्री.खोडवे व कर्मचारी उपस्थित होते. भडगाव नगरपरिषद विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी स्पर्धा परीक्षेच्या नवीन पुस्तकांची उपलब्धता करून देत असते.

तसेच वेळोवेळी मार्गदर्शक शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी पाठिंबा देत असते. भडगाव नगर परिषदेने प्रशस्त अशी अभ्यासिका उभारून यशोमार्गाचे एक नवीन दालन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. भडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्याशी चर्चा केली असता भविष्यात अजूनही नवीन उपक्रम जे की विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असतील असे कार्यक्रम राबविण्याचा भडगाव नगरपरिषद येत्या काळात नियोजन करत असून या अभ्यासिकेचा भडगाव तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व यशस्वी व्हावं असे यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.