उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाच्या पुरस्कारासाठी १५ सप्टेबर पर्यंत प्रस्ताव पाठवावेत – सुधीर मुनगंटीवार

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राज्यात येत्या १९ सप्टेबर पासून सुरु होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्कृष्ट गणेश मंडळांना राज्य शासनाकडून उत्कृष्ट गणेशमंडळ पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पुरस्कारासाठी परीपूर्ण प्रस्ताव पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected]  या ई-मेलवर १५ सप्टेबर पर्यंत पाठविण्याचे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या चार जिल्ह्यातून प्रत्येक तीन आणि राज्यातील उर्वरीत  जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ४४ उत्कृष्ट गणेश मंडळाची निवड करण्यात येणार आहे. या ४४ मंडळातून राज्यात प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या मंडळाला अनुक्रमे रुपये ५ लाख, अडीच लाख आणि एक लाख तर उर्वरीत ४१ मंडळास प्रत्येकी रुपये २५ हजार रुपये रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्जाचा नमुना, निवडीचे निकष व सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै आणि ३० ऑगस्ट २०२३ शासन निर्णयासोबत उपलब्ध करुन दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.