सहा वर्षीय बालकावर अस्वलाचा हल्ला; दोघे जखमी

टेंभरून खाण्यासाठी गेला जंगलात

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल येथील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागादेवी धरण क्षेत्रातील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या सहा वर्षीय बालकावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकला जखमी झाला असून त्याला उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या नागादेवी आदिवासी वस्तीवरील राहुल राजू बारेला (वय ६) हा इतर बालकांसोबत जंगलात टेंभरून खाण्यासाठी गेला होता. यावेळी राहुल बारेला याच्यावर अचानक अस्वलाने पाठीमागून हल्ला केला. अस्वलाने हल्ला केल्याचा हा प्रकार वस्तीतील सुनील बारेला या तरुणाच्या निदर्शनास आले. यावेळी त्याने काठीच्या सहाय्याने अस्वलाला हटकण्याचा प्रयत्न केला. यामुळे अस्वलाने तेथून पळ काढल्याने राहुल बारेला याला सोडवले.

दरम्यान अस्वलाने केलेल्या हल्ल्यामुळे राहुल हा जखमी झाला आहे. तर त्याला सोडविण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या झटापटीत सुनील बारेला याच्या पायाला देखील अस्वलाने नखे मारली आहेत. यामुळे तो देखील जखमी झाला असून दोघांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.