राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक विभागाचा संघ घोषित ; उद्यापासून राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा

0

जळगाव ;- १ डिसेंबर पासून जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू होत असलेल्या आंतर विभागीय १८ वर्षातील मुले आणि मुली च्या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्याचा मिळून नाशिक विभागाचा संघ निवडण्यात आला असून हा संघ १ डिसेंबर ला राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करेल. मुलांच्या संघात नाशिकचे ९ तर जळगावचे ३ व मुलींच्या संघात नाशिकचे १० तर जळगाव च्या २ खेळाडूंची निवड समिती सदस्य एन आय एस प्रशिक्षक राजेंद्र शिंदे व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील यांनी केली.

सदरची यादी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख यांनी घोषित केली निवड झालेले खेळाडू खालील प्रमाणे
मुली

हिमांशी ओतारी, स्वरा देवदरे, विद्या सोनार, आईलेशा झोपे, तनिष्का निकम, प्राजळ देवरे, मेघना पाटील, गझल कापसे, जागृती मंडेवाल, प्राजक्ता देवरे (सर्व नाशिक) कृपा बाविस्कर व शर्वरी कुलकर्णी जळगाव
*मुले*
शुभम जाधव, अथर्व नाठे, श्रीकांत तडाखे, विष्णू वर्मा, ललित अहिरे, भारत पवार, पंकज पोतदार ,विनायक शहा ,लोकेश मडावी (सर्व नाशिक) केतन पाटील, वेदांत बोरसे व कल्पेश डोंगरे (सर्व जळगाव)

राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक विभागाचा संघ विजयी अथवा उपविजेता ठरल्यास संघातील प्रत्येक खेळाडूंना ट्रॅक सूट, शॉर्ट, ती शर्ट,शूज कीड बॅकसह देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा जिल्हा पासिंग हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष फारुख शेख यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.