शिक्षणशास्त्र महाविदयालय येथे नॅक समितीची तिसऱ्या फेरी मुल्यांकनासाठी भेट

0

जळगाव ;- शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविदयालय, जळगावला नॅक समितीने तिसऱ्या फेरी मुल्यांकनासाठी भेट दिली. या समितीत अध्यक्ष डॉ. मनोजकुमार शास्त्री, समन्वयक डॉ. शंतनुकुमार स्वैन आणि सदस्य डॉ. राजगुरू सिन्नी सहभागी होते. भेटी दरम्यान त्यांनी महाविदयालयीन विविध समित्यासोबत सभा घेतली.

विदयार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान मोठया प्रमाणात माजी विद्यार्थी सहभागी होते. त्यात डॉ. साहेबराव भुकन (अधिष्ठाता) तसेच डॉ. समीर नारखेडे, कबचौउमवि, डॉ.राजेंद्र वाघुळदे, डॉ. अनिल झोपे, प्राचार्य जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, जळगाव, डॉ. लता मारे, विजय पवार उपस्थित होते. तसेच दि.३०.११.२०२३ राजी संस्थेच्या विविध संस्थाना, इंटर्नशिप शाळा आणि महाविद्यालयीन करार केलेल्या संस्थाना भेट देण्याचे नियाजित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.