बालदलापूरच्या विद्यार्थ्याने ब्रिटनमध्ये केलं असे कृत्य ज्याने उंचावल्या सगळ्यांच्या भुवया

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बदलापूरच्या महेश त्रिमुखे हा विद्यार्थी ब्रिटनमध्ये शिकत होता. तेथे त्याने मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेसची पदवी त्याने मिळवली. पदवी ग्रहण समारंभाचा कार्यक्रम होता. यावेळी त्याने जी कृती केली त्याचा व्हिडिओ खूपच वायरल झालाय. पदवी ग्रहण समारंभातही तो मायदेशाला विसरला नाही हे विशेष पदवी ग्रहण समारंभात महेश नारायण त्रिमुखे नावाचा उल्लेख झाला. महेश पदवी ग्रहण करण्यासाठी मंचावर गेला. त्याचवेळी त्याने आपल्या खिशातून सांभाळून भारताचा तिरंगा बाहेर काढला आणि व्यासपीठावरच डौलाने फडकावला. आपल्या मायदेशाप्रती असलेलं प्रेम महेशने अशा प्रकारे व्यक्त केलं. महेशच्या याच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होतंय. महेश जिथे शिकला त्या सेंट अँथनी कॉन्व्हेंट शाळेत त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा जाहीर सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.