जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आज जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. वादळी वारा, गार व विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी दुपारपासून जोरदार पाऊस झाला. दरम्यान यामध्ये नागदुली, ता. एरंडोल येथील शेतकरी श्रीकांत भिका महाजन (३२) यांच्या अंगावर वीज पडून ते ठार झाल्याची घटना ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली. तर पाऊस व गारामुळे ज्वारी, बाजरीसह चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.