…आणि अविश्वास ठराव नामंजूर…

0

 

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील सरपंच राहुल फालक व उपसरपंच पुष्पा पाटील यांच्यावर दी.25 जुलै रोजी तहसिलदार रावेर यांचेकडे 8 ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार अविश्वास ठरावावर आज दि. 2 ऑगस्ट रोजी तहीलदारांसह, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी समक्ष कामकाज झाले. दरम्यान यावेळी मतदान घेण्यात आले. यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने 2 मते पडली व अविस्वास ठरावाच्या विरोधात 3 मते पडली. त्यामुळे अविश्वास हा ठराव नामंजूर करण्यात आला.

यावेळी अप्पर तहसीलदार डॉ.मयुर कळसे, महसूल सहाय्यक भूषण कामळे, खिर्डी तलाठी एच.पी.जोशी, खिर्डी खुर्द ग्रामसेवक शरद बढे, निं.पो. ठाण्याचे स.पो.नि. गणेश धुमाळ, पोलिस पाटील प्रदिप पाटील, पो.हे.कॉं ज्ञानेश्वर चौधरी, पोहेकॉं रिजवान पिंजारी, अशरफ तडवी, कोतवाल अनंता कोळी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.