मावस भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

0

अमळनेर ;- तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर अत्याचार करणारा हा पीडितेच्या सखा मावस भाऊ निघाला असून त्याला पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील चिंचवर येथून ताब्यात घेत त्याच्यावर अत्याचार आणि पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील एका गावातील मजूर महिलेच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले होते. 3 मार्च रोजी सकाळी सहा वाजेपूर्वी ती अचानक गायब झाल्याने मारवड पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी आणि अल्पवयीन तरुणी धुळे येथे एमआयडीसीमध्ये राहत असल्याचे समजून मुलीला पळवून नेणारा धुळेतील तरूण हा मुलीचा मावसभाऊच असल्याचेही धक्कादायक माहिती समोर आली. पीडीत मुलीला त्याने 3 मार्च रोजी मोटरसायकलवरून पळवून नेले.

Leave A Reply

Your email address will not be published.