‘मी चांगला मुलगा, बाप नाही’ ; डॉक्टरने चिट्ठी लिहून केली आत्महत्या

0

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क

‘मी चांगला मुलगा, बाप नाही’ होऊ शकलो नाही असे आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून एका ४० वर्षांच्या डॉक्टरने आपल्याच दवाखान्यात आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये घडली असून या घटने मुले सर्वत्र खळबळ उडाली आहे. डॉ. महेश रामचंद्र तेलवेकर (वय 40 ) असे मयताचे नाव आहे.

डॉ. महेश रामचंद्र तेलवेकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये, असा उल्लेख केला आहे. “मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मी चांगला बाप होऊ शकलो नाही, मी कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही, मी काही कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये,” असा मजकूर लिहिला असल्याचे पोलिसांनी माहिती दिली.

रविवारी दुपारच्या सुमारास याच दवाखान्याच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर नायलॉनच्या दोरीने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद शिवाजी कुंभार यांनी मुरगूड पोलिसात दिली.गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मुरगुडमध्ये स्टॅन्ड परिसरात ‘ओम क्लिनिक’ नावाने दवाखाना सुरु केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.