जळगावातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पिंप्राळा येथील तरुणाने मंगळवारी दुपारी चारच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल लोटन पाटील (वय २९), असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

राहुल हा दादावाडी येथील गुजराल पेट्रोपपंपाजवळील महिंद्रा शो रूममध्ये नोकरीला होता. मंगळवारी दुपारी चारला घरात कुणीही नसताना त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आई-वडील घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. मुलाचा मृतदेह पाहून माता पित्यांनी एकच हंबरडा फोडला. त्यांची आक्रोश ऐकून शेजारी मदतीला धावून आले. शेजारी राहणाऱ्या नातेवाइकांनी त्याला तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृताच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.