प्रेमसंबंध ठेवण्याच्या तरुणीला धमक्या ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवावेच लागेल नाही तर मी आत्महत्या करुन टाकेल आणि तुझ्या घरच्या लोकांना सुद्धा मारुन टाकेेल अशी धमकी वारंवार प्रत्यक्ष भेटून देखील देत होता. यावेळी तरुणीने त्या तरुणाचा मोबाईल क्रमांक ब्लॉक लिस्टमध्ये टाकला होता. या तरूणाच्या त्रासाला कंटाळून १९ वर्षीय युवतीने राहत्या घरामध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली होती . याबाबत अशा वारंवार धमक्या देणा-या अक्षय रामचंद्र सुरवाडे (रा. पिंप्राळा) याच्या विरूध्द रविवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवार, दि. १२ मार्च रोजी आत्महत्येची घटना घडली असून तिचे अक्षय सुरवाडे या तरूणाशी प्रेमसंबंध होते. तिची समजूत काढल्याने तिने त्याच्या पासून वेगळे राहून संपर्क बंद केला होता. मात्र आनंद याने तिचा पिच्छा सोडला नसल्याने अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने टोकाचे पाऊल उचलले होते.

तरुणीच्या आईने ६ मार्च रोजी पोलिसात तक्रार दिली होती. तरीही सुरवाडे हा तिला धमक्या देत असल्यामुळे तरुणी मानसिक त्रासात होती.

शनिवारी सकाळी ११ वाजता तिने घरात कुणीही नसताना आनंद सुरवाडे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. रविवार, दि. १९ रोजी दुपारी तक्रार दिल्यानंतर तरूणाविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.