गुंगारा देणारा जयसिंघानी ७२ तासांनी गवसला !; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. गुजरातमध्ये जाऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. गुंगारा देणारा निल जयसिंघानीला ७२ तासांनी पोलिसांनी अटक केली. त्याला मलबार हिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडेही सुपूर्द करण्यात आलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या सात वर्षापासून जयसिंघानी फरार होते. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. अमृता फडणवीस यांच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिस शोध घेत होते. गुजरातमधून त्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती.

आरोपी ७२ तास पोलिसांना चकवा देत होता. बोर्डोली येथे पोलिसांनी सापळा रचला पण तेथून तो निसटला. नंतर पोलिसांनी सुरतमध्ये देखील पोलसांनी सापळा रचला पण तेथेही तो सापडला नाही. बोर्डोलीहून सुरत, बडोदा मार्गे गोधरा येथे पळून जात असताना ७२ तासांच्या पाठलागानंतर त्याला नाकाबंदी करून रात्री पावणेबाराच्या सुमारास कलोल या गोधराजवळच्या ठिकाणी पकडण्यात आलं.

आरोपीकडून मोबाईल, इंटरनेटचे डिव्हाईस कार देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी आरोपी अनिल जयसिघांनी याला मदत करणाऱ्या लोकांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

बुकी जयसिंघानीच्या अटकेनंतर डीसीपी बालसिंग राजपूत यांनी माहिती दिली की, या आरोपीविरोधात २० फेब्रुवारी रोजी मलबार पोलिस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला. हा आरोपी तांत्रिक बाबींची मदत घेऊन स्वतःची ओळख लपवत होता असे पोलिसांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.