अश्लिल व्हिडिओ तयार करुन लुबाडणारी टोळी जेरबंद

0

तीन जणांना अटक : शहर पोलिसांची कारवाई

जळगाव :- मैत्रीच्या बहाण्याने फ्लॅटमध्ये बोलावून जबरदस्तीने शारिरीक संबंधाचा व्हिडीओ तयार करुन प्रौढाजवळील रोकड हिसकावून त्याच्याकडे खंडणी मागणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी याप्रकरणी महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

या टोळीने आतापर्यंत अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळले असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
उत्तर प्रदेशातील ४८ वर्षीय एक इसम वाहनावर चालक म्हणून करतो. एका ३५ वर्षीय एका महिलेने त्याच्याशी ओळख करत मैत्रीच्या बहाण्याने त्याला तहसील कार्यालयाजवळील एका फ्लॅटमध्ये बोलवले. इसम त्याठिकाणी पोहचल्यानंतर या महिलेसह त्याठिकाणी आणखी एक २५ वर्षीय महिला आणि दोन पुरुष त्याठिकाणी होते. त्यांनी चालकाला मारहाण केली व त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंधाचे व्हिडिओ तयार केले.

व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या चालकाकडून ६५ हजारांचा ऐवज काढून घेतला आणि आणखी ५० हजारांची मागणी केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोहेकॉ संतोष खवले, प्रफुल्ल धांडे, भास्कर ठाकरे, राहुल पांचाळ, अमोल ठाकूर यांच्यासह महिला पोलीस धनश्री दुसाने, वैशाली पावरा, अश्विनी इंगळे यांच्या पथकाने तपासचक्रे फिरवित संशयितांना अटक केली.

हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी चालकाशी संपर्क करणाऱ्या महिलेच्या मोबाईल क्रमांकावरुन एका ३० वर्षीय महिलेला ताब्यात घेतले. त्या महिलेने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यानंतर उमेश सुरेश बारी (वय २९, रा. जळगाव) याच्यासह प्रमोद पंडीतराव कुलकर्णी (वय ७३, रा. जळगाव) या तिघांना अटक केली. तर मुख्यसूत्रधार असलेल्या दोन महिलांसह भूषण पाटील हे तिघे अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये असलेल्या अपार्टमेंटील फ्लॅटमध्ये अश्लिल व्हिडीओ तयार करीत असल्याचा प्रकार सुरु होता. हा प्रकार सुरु असतांना यातील काही संशयित तोतया पोलीस बनवून त्याठिकाणी छापा टाकून पैसे देखील उकळत असल्याचे समोर आले आहे.

शहरातील तहसील कार्यालयाजवळील अपार्टमेंटमध्ये प्रमोद कुलकर्णी यांचा फ्लॅट आहे. मैत्री करण्याच्या बहाण्याने ही टोळी त्या व्यक्तीला भेटण्यासाठी त्याठिकाणी बोलावून घेत होती. याठिकाणी ते जबरदस्तीने अश्लिल व्हिडीओ तयार करुन ते संबंधिताकडून खंडणी वसूल करीत होते. आतापर्यंत त्यांनी अनेकांकडून खंडणी वसुल केली असून यात सर्वाधिक प्रौढ व्यक्तींचा समावेश आहे. समाजात बदनामी होईल या भितीपोटी कोणीच तक्रार देण्यासाठी पुढे आले नसल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून उघड झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.