जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले !

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना जळगाव शहरातील एका परिसरात उघडकीस आली असून अज्ञात व्यक्तीविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी१६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी फूस लावून पळवून नेले. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही मिळून न आल्याने अखेर तिच्या पालकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गोपाल देशमुख करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.